निसर्ग व पर्यावरण संघटना, ग्रामपंचायत सिद्धनेीं, सह्याद्री देवराई व समाज विकास केंद्र यांच्या संयुक्त उपक्रमातून येथील शेरी पाणंदीच्या दुतर्फा २०१ रोपे लावण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बकुळ, सोनचाफा, जारुळ अशी देशी झाडे व आंबा, फणस, चिक्कू, चिंच अशी फळझाडे लावण्यात आली. गेल्या ४ वर्षांपासून सिद्धनेर्ली येथे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू असून, आजअखेर गावात विविध उपक्रमांतर्गत एकूण २५०० हून अधिक वृक्ष लागवड केली आहे.
यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील, आयपीएस अधिकारी स्वप्नील माने, कृष्णात मेटील, मधुकर येवलुजे, जयवंत पोवार, कॉ. शिवाजी मगदूम, बी. जी. पाटील, टी. एस. गडकरी, बी. वाय. पाटील, नामदेव पाटील, नामदेव साळोखे (हसुर खुर्द), बटू शिरोळे (करनूर), डॉ. रणदिवे (वंदूर), राजेंद्र घराळ, कृष्णात पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

