वृक्षारोपण | कुर्ला येथे सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन, यशवंत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण
आई जशा मुलांच्या वेदना जाणू शकते. तो जशी बाळावर जिवापाड प्रेम करते, तसे आपण वृक्ष-वेलींवर प्रेम करणे पर्यावरण संवर्धनासाठी गरजेचे आहे. प्रगतीच्या नावाखाली आपण मागील अनेक वर्षांत बेसुमार वृक्षतोड केली. त्यामुळे पर्यावरण ढासळलेले असून प्रत्येक नागरिक, विद्याथ्यांने झाड लावून ते जगवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले.
कुर्ला (ता. बीड) येथे रविवारी (ता.१२ ऑगस्ट) यशवंत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण प्रसंगी सिनेअभिनेते शिंदे बोलत होते. व्यासपीठावर गायिका नित्यश्री, कृषिभूषण शिवराम घोडके, केरवा गुंड, राहुल आवारे, बनसोडे, रघुनाथ ढोले, रामेश्वर मोरे, प्रदीप शेळके, शेख अजीज, तुषार पाटील, हनुमान कानडे, सरपंच अंगद घोडके, अनिल पाटोल, कुलांच्या सरपंच अर्चना पाटील, शामसुंदर डोंगरे, अप्पा डोंगरे, राजाभाऊ गव्हाणे, राहुल गुंड, अक्षय गुंड, दत्ता खोटे, बाळू यादव, महेश गुंड, विष्णू डोंगरे, भरत पटेकर, राधाकिसन पटेकर, ठकसेन थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
सयाजी शिंदे म्हणाले, शाळा हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे महत्त्वपूर्ण साधन असून या ज्ञान मंदिराचा सर्वा सर्वांनी योग्य सन्मान राखावा. माझ्या शाळेसह मित्रांनी केलेल्या धमाल अनमोल क्षणाचे मला कायम स्मरण होत असते. बालपण हे निरागस आणि स्वच्छ मनाचे व निःस्वार्थी असते. चांगले ज्ञान प्राप्त करा. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवा आणि एकतरी, वृक्ष शाळेच्या परिसरातील लावा. आपल्या परिसरात पावसाचे पाणी आडवा, जेणेकरून परिसर जलसमृद्ध होईल. विज्ञानाची कास घरत दर्जेदार शेती पिकवली पाहिजे.. तसेच ग्रामस्थांनी माता मावळ्यांनी आपले घर, आपला गाव, वाड्या स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन मुलींच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना संधी द्यावी. कारण मुली आपले नाव दोन्हीही घरी उज्ज्वल करते. मुलींना दर्जेदार शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. कृषिभूषण शिवराम घोडके म्हणाले,
संतांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ही शिकवण दिली असून प्रत्येकाने ती आत्मसात केली तर ही तर निसर्गाचा ढासळलेला समतोल दूर होण्यास वेळ लागणार नाही.
मानवी जीवनात वृक्षाचे खूप महत्त्व असून वृक्षाचे साल, खोड, पान सुद्धा आपल्या उपयोगी आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्याची आठवण म्हणून आपल्या परिसरात एक तरी वृक्षाची लागवड करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य धनवंत मस्के यांनी केले. या वेळी पर्यवेक्षक भोसले, काकडे, कंठाळे, पवार, प्रा.शेख, श्रृंगारे, मुसळे, राख, कदम, अंबेकर, माने, आदींसह परिसरातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

सयाजी शिंदे भारावले.
यशवंत विद्यालय परिसरात आलेल्या सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांचे विद्याथ्यांनी लेझीम पथक, बँड पथक व गीत गात स्वागत केले. यासह ग्रामस्थांनीही या वेळी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या आदरातिथ्याने अभिनेते सयाजी शिंदे भारावून गेले होते.
