येऊन येऊन येणार कोण? झाडांशिवाय आहेच कोण !

2019

अभिनेते सयाजी शिंदे यांची विधानसभा निवडणुकीनंतर वृक्षसंमेलनासाठी नवी घोषणा

लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुका येतात जातात मात्र झाडे ही आपली ऑक्सिजन बँक असून त्यामुळेच पालवण येथील देवराईत जानेवारीमध्ये वृक्षसंमेलन घेण्यात येणार आहे. या वृक्ष संमेलनासाठी येऊन- येऊन येणार कोण, झाडांशिवाय आहेच कोण ? ही नवी घोषणा सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी शनिवारी पालवण येथील देवराईत केली. यावेळी सयाजी शिंदे यांच्यासह संपादक गंमत भंडारी, महेश वाघमारे, गणेश सावंत व पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बीड शहरापासून जवळच असलेल्या पालवण येथील सह्याद्री देवराई परिसरात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी लेखक, पटकथा दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्यासह पेन येथील शिल्पकार किशोर ठाकूर, गोंदवले येथील सिव्हील इंजिनियर सतिष मोरे, पनवेल येथील इंजि. सचिन चंदने, वृक्ष तज्ञ रघुनाथ होले, सह्याद्री देवराई प्रकल्पाचे सचिव मधुकर फल्ले (सातारा) यांच्यासह शिवराम घोडके, बीडच्या सहाय्यक वनअधिकारी सोनालीताई वनवे उपस्थित होत्या.

पालवण येथे शासनाच्या वनविभागासह लोकसहभागातूनसह्याद्री देवराई हा प्रकल्प मागील तीन वर्षापासून सुरू आहे. वृक्ष संगोपनाची चळवळ अधिकाधिक व्यापक व्हावी. मी अन माझे इतकाच संकोचित विचारन करता प्रत्येक नागरीकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि झाडांमुळे मिळणारया शुध्द हवेचे महत्त्व जाणण्यासाठी झाडे लावावीत ती जगवावीत या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात असून मागील दोन वर्षात याठिकाणी १ लाख ६४ हजार विविध जातींच्या वृक्षांची लागवड केली गेली आहे. २०७ हेक्टर क्षेत्राचा हा परिसर लोकसहभागातून परिपूर्ण केला जात आहे. पालवणचा हा सह्याद्री देवराई हा

देवराईत जावून वाढदिवस साजरा करा, आम्ही त्यांचे फोटो प्रकाशित करू सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी देवराई प्रकल्पाच्या मोहिमेत सर्वांच्या सहभागाची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे पालवण येथील देवराईत जावून रोपटे किंवा पाणी देऊन वाढदिवस साजरा करणा-यांनी आमच्याकडे फोटो आणि वात मी पाठवावी. दै. पार्श्वभूमी त्यास ठळक प्रसिद्धी देईल.
Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*