‘सह्याद्री देवराई’ मध्ये होणार फुलपाखरु उद्यान

अभिनेते सयाजी शिंदे; ८ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

सह्याद्री देवराई आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त सहकार्याने म्हसवे गावच्या हद्दीत पोलीस शूटिंग रेंजच्या लगत असणाऱ्या सह्याद्री देवरई प्रकल्पामध्ये येत्या आठ ऑक्टोबर रोजी फुलपाखरू उद्यानाचे उदघाटन ज्येष्ठ उद्योजक फरोख कूपर यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय फळबाग उद्यानाचेही अनावरण यानिमित्ताने केले जाणार असल्याची माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सह्याद्री देवराई प्रकल्प परिवाराचे सदस्य डी. एम. निंबाळकर, संतोष पोळ, मधुकर फड़े इत्यादी उपस्थित होते. सपाजी शिंदे म्हणाले, ‘सह्याद्री देवराई प्रकल्पाला म्हसवे गावाच्या हद्दीतील एकूण शंभर एकरापैकी २५ एकर जागा वृक्ष संवर्धनाकरिता मिळाली आहे.

या देक्राई प्रकल्पामध्ये तब्बल साडेनऊशे प्रकारच्या पाहावयास प्रकल्पामध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क करण्याची मोठी योजना असून महाराष्ट्रामध्ये वृक्ष प्रसार चळवळ तळागाळात रुजवण्याचे नियोजन आहे.” साताऱ्याच्या पर्यावरण क्षेत्रामध्ये येणाऱ्या वनस्पती तसेच आयुर्वे द आणि भारतीय पुराणांमध्ये वंद्य असणाऱ्या जुन्या वनस्पती यांचा अभ्यास करून त्या त्या प्रवातीचे वृक्ष सह्याद्री देवरई प्रकल्पामध्ये राबवण्याचे नियोजन आहे. यामध्ये बेल, रुद्राक्ष, चिंच, करंव, पिंपळ, । वड यांसारख्या प्रजातींना प्राधान्य दिले जात आहे.

ही वृक्ष प्रसाद चळवळ महाराष्ट्रातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राबवली जात असून त्याला स्वतंत्रपणे किंवा क्यू आर कोड देऊन त्या माध्यमातून त्यांचं संवर्धन व्यवस्थित होते की नाही याची सुद्धा माहिती गोळा केली जात आहे, असे शिंदे यांनी येथील सह्यादी देवराई प्रकल्पामध्ये आतापर्यंत सुमारे एक हजाराहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. सह्याद्री देवराई प्रकल्पातून वृक्षप्रसाद चळवळ ही साताऱ्याची लोक चळवळ व्हावी आणि त्यातून पर्यावरणाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, हे सह्याद्री ! देवराई प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आहे. यामध्ये संपूर्ण सातारकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*