सह्याद्री देवराई प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल

हस्ते डोंगर रांगेत वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या कामांची माहिती देतांना सयाजी शिंदे म्हणाले, आज शहरांमध्ये वाढत्या प्रदुषणामुळे शुध्द हवा मिळणे कठीण होवून बसले आहे. अशावेळी एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी पद, पैसा हे सारे बाजूला ठेवून वृक्ष लागवड व संगोपणासाठी वेळ दिलाच पाहिजे.

सह्याद्री देवराई प्रकल्पातून ऑक्सीजन झोन तयार केला जात आहे. या परिसरात विशिष्ट जातीची झाडे चिटकून लावली जात असून यातून भविष्यात घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. या परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची झाडे लावली जात आहेत. या झाडांमुळे पर्यावरण समृध्द होईल शिवाय या भागात पावसाचे प्रमाण वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘येवून, येवून येणार कोण? झाडांशिवाय हायच कोण?’ ही टॅगलाईन घेवून आम्ही सारे याठिकाणी काम करत असून स्थानिकांनीही या चळवळीत पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जानेवारीत पालवनला पहिले वृक्ष संमेलन सह्याद्री देवराई प्रकल्प अधिक परिणामकारक पध्दतीने राबवला जात असून या ठिकाणी येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राचे पहिले वृक्ष संमेलन आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी दिली. या संमेलनाच्या तयारीसाठी व्यापक बैठका घेतल्या जात असून बीडकरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. या संमेलनात जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार असून याठिकाणी किमान ५० स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यात फुलपाखरांच्या विविध जातींचे फोटो प्रदर्शन भरवले जाणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम पर्यावरण तज्ञ या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे सांगत संमेलनानिमित्त बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कार्यक्रमस्थळापर्यंत वृक्षदिंडी काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*