नातेवाईकांच्या स्मृती झाडे लावून जपा
सिद्धनेलों, ता. ३०: मयत नातेवाईकांच्या स्मृती झाडे लावून त्यांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करून जपाव्यात, असे आवाहन सह्याद्री देवराईचे प्रमुख सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.
येथील वैकुंठभूमी परिसरातील सुशोभीकरणाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच दत्तात्रय पाटील होते. येथे सह्याद्री देवराई प्रणीत निसर्ग व पर्यावरण संघटनेने लोकसहभागातून सुशोभीकरण केले आहे. यामध्ये मयत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षांना पारकट्टे, बैठकीसाठी सिमेंट बाकडी, संरक्षक भिंत तसेच वृक्षांना क्यूआर कोड बसवून परिसराचे सुशोभीकरण केले आहे. याचे शिंदेंनी कौतुक केले. या वेळी आदर्श बीमा ग्राम पुरस्कार सिद्धनेलीं ग्रामपंचायतीस देण्यात आला. त्यापोटीचा एक लाखाचा धनादेश शिंदे यांच्या हस्ते सरपंच पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
शिंदे म्हणाले, “लोकवर्गणी व लोकसभागातून वृक्षारोपणसह वैकुंठभूमी सिद्धनेलॉकरांचा सुशोभीकरणाचा उपक्रम इतर गावांनाही प्रेरणादायी आहे.” या वेळी सरपंच दत्तात्रय पाटील, मधुकर येवलुजे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुहास वायंगणकर, सचिन चंदने, मधुकर फल्ले, कृष्णात मेटील, वाय. व्ही. पाटील, शिवाजी मगदूम, लक्ष्मण गुरव, दीपक पाटील, पोपट तर्वदे, पवन पोवार, संजय पाटील, दिपक कोळी, विजय कुंभार, रवींद्र पोवार उपस्थित होते. विवेक पोतदार यांनी स्वागत केले. विजय मोरबाळे यांनी आभार मानले.

