अशोक जायभाय यांचा झाला आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान
गावात ६००० पेक्षा जास्त झाडे श्रमदान करून लावणारे कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील सरपंच अशोक जायभाय यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक यादवराव पावसे, हवामान अभ्यासक पंजाबराव डक, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, नागेवाया उद्योग समूहाचे अध्यक्ष कडू भाऊ काळे, लक्ष्मण गोरडे, साहेबराव घाडगे, बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते
हा पुरस्कार देण्यात आला. दुरगाव या गावाने मागील तीन वर्षांपासून माझी वसुंधरा अभियान यामध्ये सहभागी होऊन ६००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत, मागील तीन वर्षांपासून सर्व ग्रामस्थ श्रमदान करून गावाची स्वच्छता व झाडांचे संगोपन आणि वृक्षारोपण करत आहे, यासाठी सरपंच अशोक जायभाय यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत वृक्षमित्र व
देशातील प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी गावाला आतापर्यंत भेट देऊन पाहणी केली आहे.
जायभाय हे सन २००० पासून सलग ग्रामपंचायतमध्ये निवडून येत आहेत, तसेच तीन वेळा आतापर्यंत सरपंच पद भूषवले आहे.
सरपंच सेवा संगठ दुरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे काम देखील तालुक्यात अतिशय उत्कृष्ट असून गेल्या सतरा वर्षांपासून येथे त्यांची सत्ता आहे. या गावांमध्ये नऊ किलोमीटर मध्ये नांदणी नदी बरोबर गावाच्या मधोमध वाहत आहे. तिची हंदी साधारण ३० ते ३५ मीटर आहे. संपूर्ण नदीवर साखाली पद्धतीचे बंधारे अशोक जायभाय पांच्या पुढाकारामधून बांधण्यात आले आहे. संपूर्ण नदीचे खोलीकरण करण्यात आले आहे व पाणी अडवल्यामुळे गावाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. गावामध्ये पूर्वी अवमे पाचशे लिटर दूध उत्पादन होत होते, मात्र जलसंधारणाची मोठे काम झाल्यामुळे जवळपास १६ हजार पेक्षा जास्त दध उत्पादन रोज गावामध्ये होत आहे. या दूध व्यवसायामधून जवळपास दरमहा दोन कोटी रुपयांची उलाढाल गावामध्ये होत आहे. याशिवाय शेती पूर्वक व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. गावाचा संपूर्ण चेहरा बदलण्याचे काम करण्यात आले आहे.
यामध्ये प्राथमिक शाला, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत हे सर्व अतिशय अद्यावत सुंदर अशा पद्धतीने करण्यात आले असून, गावातील मंदिर परिसर, ग्रामपंचायत चौक व स्मशानभूमी यांची देखील सुशोभीकरण करण्यात आले आहे. गावामध्ये असणाऱ्या गावठाण अंतर्गत सर्व रस्ते, गटारी, स्टेट लाईट पांचे योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणामध्ये झाडे लावण्यात आले आहे. या सर्व कामाची दखल घेत सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन २०२३ यावर्षीचा आदर्श सरपंच पुरस्कार दुरगाव येथील सरपंच जायभाय यांना देण्यात आला आहे. या पुरस्काराची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

