सयाजी शिंदे; सचिन जगताप यांचा अभीष्टचिंतन सोहळा
वृक्षलागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. जागतिक पातळीवर तापमान वाढीच्या नोंदी दिसून येत असून, पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्षलागवड हा सर्वांच्या अजेंड्यावरील विषय व्हायला हवा, असे मत अभिनेते, वृक्षमित्र सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त बनपिंप्री येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सचिन जगताप हे अष्टपैलू नेतृत्व असून, विविध क्षेत्रांत त्यांचा वावर आहे. राजकारणासोबतच शेती, तसेच अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये साखळी बंधारऱ्यांसारख्या नावीन्यपूर्ण योजना राबवून दुष्काळग्रस्त भागात चांगले काम केले आहे, असे गौरवोद्गार सयाजी शिंदे यांनी या निमित्ताने काढले.
कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार झाला. आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, दादासाहेब जगताप, खेड
बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक सागर गवळी, अक्षय कर्डिले, बैलगाडा संघटनेचे रामकृष्ण टाकळकर, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, बी. आर. शिंदे, सिद्धेश्वर देशमुख, बाळासाहेब उगले उपस्थित होते. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड व गौतम काळे यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांनी आभार मानले.


