वाडेगाव येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात प्रतिपादन
राज्यात सर्वांना परिचित असलेले प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख हे हवामानाचा अचूक अंदाज देऊन शेतकऱ्यांना सतर्क करण्याचे काम करतात. त्यामुळे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सहकार महर्षी कै. डॉ. बा.रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमाने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रमुख वक्ते प्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिवसेंदिवस सिमेंट, लोखंड, रस्ते, वृक्षतोड यामुळे होणाऱ्या पृथ्वीवरील तापमान वाढ, त्याचा पावसात अनियमितता व गारपीट रोखण्यासाठी भविष्यात झाडे लावण्याची नितांत गरज असल्याचे मत शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केले, तसेच यावर्षी पावसाला विलंब का झाला, यानंतर पावसाचे आगमन कधी होणार, गारपिट कोणत्या भागात जास्त होते, विजा कुठे पडतात शेतकरी संवाद मेळावा आणि विजा फायद्याच्या कशा व विजांमुळे नुकसान कसे व आपल्याकडे घेण्यात येणाऱ्या सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे बीजप्रक्रिया ते पीक काढणीपर्यंतचे मार्गदर्शन यामध्ये पिकांबद्दल उतारा जास्त येण्यासाठी कशा पध्दतीने नियोजन करावे, पिकांवरील रोगराईचे नियोजन, लागवड करताना लागवडीतले अंतर लांबणीवर पडलेला मान्सून, येत्या २५ जून रोजी राज्यात पावसाला सुरुवात होणार असून, १५ जुलैपर्यंत पेरण्या होणार असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त केला. यांसारख्या शेती संबंधित विविध विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले.
यावेळी बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सेवकराम ताचोड, पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अरुण कचाले तसेच संचालक संदीप पाटील. रवींद्र पाटील सरप, रमेश ठाकरे, मुरुमकार, सर्व संचालक मंडळ, जि.प. सदस्य राम गव्हाणकर, पं.स. सदस्य धनंजय दांदळे, व्याळा सरपंच गजानन बजिरे, सचिव नावकार, तसेच परिसरातील पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (ता.प्र.)

