बीडमध्ये जानेवारीत होणार पहिले वृक्ष संमेलन; ५० स्टॉल, फुलपाखरांच्या फोटोचे असेल प्रदर्शन

2019

अभिनेते सयाजी शिंदेंनी व्यक्त केला विश्वास; देवराईत पावणे दोन लाख वृक्षांचे होते संगोपन

या परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची लावली आहेत झाडे

सह्याद्री देवराई प्रकल्प अधिक परिणामकारक पध्दतीने राबवला जात असून या ठिकाणी येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राचे पहिले वृक्ष संमेलन आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी दिली. या संमेलनात जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार असून याठिकाणी किमान ५० स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यात फुलपाखरांच्या विविध जातींचे फोटो प्रदर्शन भरवले जाणार आहे, अशी माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली. शनिवारी सायंकाळी सह्याद्री देवराई परिसरात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याप्रसंगी लेखक, पटकथा दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्यासह पेन येथील शिल्पकार किशोर ठाकूर, गोंदवले येथील सिव्हील इंजिनियर सतिष मोरे, पनवेल येथील इंजि. सचिन चंदने, वृक्ष तज्ञ रघुनाथ ढोले, सह्याद्री देवराई प्रकल्पाचे सचिव मधुकर फल्ले (सातारा) यांच्यासह शिवराम घोडके बीडच्या सहाय्यक वनअधिकारी सोनाली वनवे उपस्थित होत्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डोंगर रांगेत वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली.

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या कामांची माहिती देतांना सयाजी शिंदे म्हणाले, आज शहरांमध्ये वाढत्या प्रदुषणामुळे शुध्द हवा मिळणे कठीण होवून बसले आहे. अशावेळी एक जवाबदार नागरीक माणून सर्वांनी पद, पैसा हे सारे बाजूला ठेवून वृक्ष लागवड व संगोपनासाठी वेळ दिलाच पाहिजे. सह्याद्री देवराई प्रकल्पातून ऑक्सीजन झोन तयार आहे या परिसरात विशिष्ट जातीची झाडे चिटकून लावली जात असून यातून भविष्यात घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. या परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची झाडे लावली जात आहेत. या झाडांमुळे पर्यावरण समृध्द होईल शिवाय या भागात पावसाचे प्रमाण वावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वृक्ष संगोपणामुळे पर्यावरण समृध्द होईल शिवाय या भागात पावसाचे प्रमाण वाढेल असा विश्वास या टिमला आहे. ‘येवून, येवून येणार कोण? झाडांशिवाय हायचं कोण? ‘ ही टॅगलाईन घेवून ही सारी मंडळी येथे काम करत असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, शासन, लोकसहभागातून या ठिकाणी आता सह्याद्री देवराई प्रकल्पातून ऑक्सीजन झोन तयार केला जात आहे, या परिसरात लाखो झांडाची लागवड केली गेली आहे. यातून भविष्यात घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. या परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची झाडे लावली जात आहेत.
१ लाख ६४ हजार विविध जातींच्या वृक्षांची लागवड मागील दोन वर्षात याठिकाणी १ लाख ६४ हजार विविध जातींच्या वृक्षांची लागवड केली आहे. २०७ हेक्टर क्षेत्राचा हा परिसर लोकसहभागातून परिपूर्ण केला जात आहे. अभिनेते सयाजी शिंदे व त्यांच्या टिमने यासाठी झोकून देवून काम सुरु केले आहे. ग्रामस्थांचाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. बीडच्या वनविभागाने जागा उपलब्ध करुन दिली.

पालवण शिवारातील सह्याद्री देवराई परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत अभिनेते सयाजी शिंदे बोलत होते. याप्रसंगी लेखक, पटकथा दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्यासह पेन येथील शिल्पकार किशोर ठाकूर, गोंदवले येथील सिव्हिल इंजिनिअर सतीश मोरे, पनवेल येथील इंजि. सचिन चंदने, वृक्ष तज्ज्ञ रघुनाथ ढोले आदी.

संमेलनाच्या तयारी सुरू….
बीड शहराजवळच्या पालवण येथे वन विभागासह लोकसहभागातून सह्याद्री देवराई हा प्रकल्प राबवला जात आहे. वृक्ष संगोपनाची चळवळ अधिकाधिक व्यापक व्हावी. ‘मी अन माझे’ इतकाच संकोचित विचार न करता प्रत्येक नागरीकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्व जाणण्यासाठी झाडे लावावीत ती जगवावीत या उद्देशाने तसेच ‘येवून, येवून येणार कोण? झाडांशिवाय हायच कोण?’ ही टॅगलाइन घेऊन सह्याद्री देवराई येथे पथदर्शी प्रकल्पाचे काम सुरू केल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह त्यांच्या टिमने यासाठी झोकून देऊन काम सुरु केले आहे. ग्रामस्थांचाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या संमेलनाच्या तयारीसाठी व्यापक बैठका घेतल्या जात असून बीडकरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्रातील ख्यातनाम पर्यावरण तज्ञ या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*