पुण्यात देवराई व सीड बँक करणार

अभिनेते सयाजी शिंदे ‘सह्याद्री देवराई’ संस्थेतर्फे ‘वृक्ष संवाद २०२२’ कार्यक्रम

महाराष्ट्रात सह्याद्री देवराईच्या सहकाऱ्यांच्या योगदानाने महाराष्ट्रात वृक्ष लागवड वाढत आहे. वन विभागाचे सहकार्य वाढत आहे. संस्थेच्या वतीने पुण्यात देवराई व सीड बँक करणार आहोत, असे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.
‘सह्याद्री देवराई’ संस्थेतर्फे ‘वृक्ष संवाद २०२२’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, डॉ. चंद्रकांत साळुंखे, सतीश आवटे यांनी मार्गदर्शन केले. श्रीकांत इंगळहळ्ळीकर, धनंजय शेडबाळे, विजय निंबाळकर, मधुकर फल्ले यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी उपस्थित होते. यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा, सह्याद्री देवराई संस्थेच्या कृतिशील सदस्यांचा आणि सी.
एस. आर. फंडाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीला मदत करणाऱ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. देशी वृक्षांच्या बियांच्या वृक्षांची थैली भेट देण्यात आली. सह्याद्री देवराई संस्थेच्या सदस्यांकरिता होता. देशी वृक्षांच्या बियांचे प्रदर्शनही मांडले होते.

यावेळी अरविंद जगताप, राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सह्याद्री देवराई संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या आवाजातील गीताचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेने महाराष्ट्रात १० लाख वृक्ष लागवड केल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

Posted in UncategorizedTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*