अभिनेते सयाजी शिंदे; कळंबा येथील वडाच्या झाडाला दिले जीवदान
पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्याइतकी झाडे लावावीत. देशात वृक्ष बैंक तयार होण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, असे सांगत झाडांचा बळी घेणाऱ्या वेन सॉ कटर’ यंत्रावर बंदी घालण्याची मागणी चित्रपट अभिनेते सयाजी शिदि यांनी केली.
कळंबा तलाव परिसरातील १०० वर्षापूर्वीचे वडाचे झाड मुसळधार पाऊस, वादळ आणि वाऱ्याने उमळून पडले होते. ते झाड पुन्हा नैसर्गिक प्रक्रिया करून रोपण केले. सयाजी देवराई फाऊंडेशन व संजय घोडावत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात अभिनेते शिदि बोलत होते. जेसीबी यंत्र, दहा कर्मचारी व अन्य यंत्रसामग्रीच्या साह्याने आठ तासाच्या अथक प्रयत्नानंतर डेरेदार वृक्षाचे पुनर्रोपण केले. झाडाची पुन्हा जोमाने वाढ व्हावी यासाठी त्याच्या बुंध्यावरती निसर्ग तज्ज्ञसुहास वायंगणकर यांनी नैसर्गिक परिक्रिया केली.
अभिनेते शिंदे म्हणाले, “झाडे ऑक्सिजन देतात. त्यामुळे प्रत्येकाने संवेदनशीलतेने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाने सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. तरच मोकळ्या जागेवर देवराई निर्माण होईल.” निसर्गतज्ज्ञ सुहास वायंगणकर म्हणाले, “देशी व विदेशी वृक्षांची लागवड करणे महत्त्वाचे आहे. वनौषधी विविध प्रकारची झाडे, झुडपे याचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. तरच हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढणार आहे, पशुपक्षी, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षांचे जतन संवर्धन होणे काळाची गरज आहे.” सरपंच सागर भोगम, उपसरपंच राजेंद्र गुरव, निसर्ग मित्र परितोष उरकुडे, अभिजित वाघमोडे, मनिषा ससे, डॉ. सुधीर ससे, सदस्य सुहास जंगम, सुधीर पाटील, बेकरी उद्योजक अरुण पाटील, दत्तात्रय कासोटे, भूषण कळंत्रे, दिलीप पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

