अभिनेते सयाजी शिंदे उद्या पत्रकार परीषदेत माहिती देणार
बीड : चित्रपट अभिनेते तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतुन पालवण जवळील देवराईत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची चळवळ हाती घेण्यात आली आहे. याच ठिकाणी जगात ले पहिले वृक्ष संमेलन दि. १३ व १४ फेब्रुवारी होणार आहे. या संमेलनासाठी राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोप-यातुन अनेक मान्यवर येणार आहेत. या संदर्भात सयाजी शिंदे हे दि. २२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पत्रकार परीपद घेऊन या वावतची अधिक माहिती देणार आहेत. बीड शहरापासुन जवळच असलेल्या पालवण परीसरात पर्यावरण संवर्धनासाठी देवराईची निर्मिती करण्यात आलेली आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतुन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सयाजी शिंदे हे उद्या दि. २२ जानेवारी रोजी स्वतः गाडीभर कॅक्टसची झाडे घेऊन येत आहेत. सोवत ५५ मोठी झाडे ही लागवडीसाठी घेऊन येणार आहेत. देवराईत विविध स्वरूपाची झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे जगविण्याची, पाणी पुरविण्याची जवाबदारी तुमची आमची सर्वांचीच असणार आहे. नुसते मी कौतुक नको तर झाडे जगली पाहिजे.

