अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराईला आग

अभिनेते आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बीडमधील सह्याद्री देवराईला रविवारी दुपारी आग लागली आहे. या आगीत दोन न एकरमधील झाडांचे नुकसान झाले आहे. तब्बल दोन तासांनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश मिळाले.
पालवन गावाजवळ २५ एकर सह्याद्री । देवराईचा परिसर आहे. या ठिकाणी सर्व देशी झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. या आगीत वड, पिंपळ आणि लिंबाचे झाड जळून खाक झाले आहे. आगीत तब्बल दोन एकरचा परिसर जळून खाक झाला आहे. सह्याद्री देवराईला आग लागल्याचे लक्षात येताच वन वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग जास्त पसरत गेली. तब्बल दोन तासानंतर ही आग विझवण्यात यश मिळाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सयाजी शिंदे हे वृक्ष लागवडीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. ते सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. सयाजी शिंदे यांनी ‘सह्याद्री देवराई’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध देवराया उभ्या केल्या आहेत.

सयाजी शिंदे यांनी स्वतःला वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात झोकून दिले आहे. माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू तब्बल २००-३०० वर्षे देण्याचे काम झाडेच करत असतात. हीच बाब लक्षात घेत सयाजी शिंदे आणि त्यांची टीम झाडे लावणे आणि ती जगवण्याचे कार्य करीत असते. त्यांच्या या कार्याचे राज्यासह देश विदेशातही कौतुक होत असते.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*