अंबाबाईचा वृक्षप्रसाद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल

अभिनेते मनोज वाजपेयी : सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनव उपक्रमाचा प्रारंभ

पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, अंबाबाई वृक्षप्रसाद उपक्रमाच्या माध्यमातून देवीनेच आपल्याला आशीर्वाद दिला आहे. हा उपक्रम समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी केले. ते सह्याद्री देवराई संस्था, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, सामाजिक वनीकरण विभागातर्फे आयोजित वृक्षप्रसाद लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
अंबाबाई मंदिरात झालेल्या या उपक्रमाच्या प्रारंभाला देवराई उपक्रमाचे अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे, वनक्षेत्रपाल सोनल केसरकर, देवस्थान समितीचे महादेव दिंडे, धनाजी जाधव, फिनोलेक्सचे अविनाश जैस्वाल, सुहास वैंगणकर, अमित दिंडे उपस्थित होते. स्वागत शैलेश बांदेकर यांनी केले. प्रारंभी वृक्षप्रसादासाठी मातीचे कलश बनवलेल्या आनंदा कुंभार (खुपिरे) यांचा सत्कार करण्यात आला. अभिनेते वाजपेयी म्हणाले, अंबाबाईचीच ही इच्छा होती. त्यामुळे अभिनेते सयाजी शिंदे यांना मंदिरात वृक्षप्रसाद उपक्रम करण्याची योजना सुचली. आता पृथ्वी वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकाने हा प्रसाद घरी घेऊन जावा.
सयाजी शिंदे म्हणाले, अंबाबाईच्या वृक्षप्रसाद रूपाने भक्तांच्या अनेक पिढ्यांना हा मिळणार आहे. आता हिरवी मशाल सर्वत्र पसरली आहे. सध्या मुंबईचे सिद्धिविनायक मंदीर, पुण्याचे दगडूशेठ हलवाई मंदिरात हा प्रयोग यशस्वी होत आहे.
यावेळी अवधूत जोशी, राहुल जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*