काल बीड जिल्ह्यातील पालवण येथे प्रथम जागतिक वृक्ष संमेलनाची मोठ्या थाटात सुरुवात झाली. हे संमेलन आपल्या बीड जिल्ह्यात संपन्न होत आहे याचा माझ्यासह लाखो बीडकरांना अभिमान वाटतो. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ज्येष्ठ सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा अनोखा उपक्रम राबवण्यासाठी बीड जिल्ह्याची निवड केली त्याबद्दल सयाजी शिंदे यांचे आमच्या लाखो बीड वासियांतर्फे लाख लाख आभार. वृक्षलागवडीचा आणि संगोपनाचा हा प्रयोग महाराष्ट्रात कोठेही राबवता आला असता परंतु सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी बीडची निवड केली हे आपले भाग्य म्हणावे लागेल. पहिल्या जागतिक वृक्ष संमेलनामुळे आज बीड जिल्हा संपूर्ण भारतात ओळखला जात आहे आगामी काळात बीड जिल्ह्याची ओळख या अतुलनीय उपक्रमामुळे होईल हे नक्की. विशेष म्हणजे यापूर्वी देखील बीडमध्ये ज्येष्ठ सिने कलावंत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जे भरीव काम केले त्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना व्यवसाय उपयोगी साहित्य देत नाना व मकरंद यांनी त्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभे केले. यामुळे आज कित्येक आत्महत्याग्रास्त शेतकऱ्यांच्या स्त्रिया स्वतः मेहनत करत दोन पैसे कमवत आहेत. त्याचबरोबर नदी खोलीकरण, नदी रुंदीकरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रात नामने केलेले काम किती महत्त्वाचे होते हे नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात दिसून आले. बीड जिल्ह्यात सयाजी शिंदे, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि अरविंद जगताप या या चंदेरी दुनियेतील नायकांनी जे काही कार्य केले आहे ते खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. अशावेळी ‘तुम्हीच आमचे खरे नायक आहात’ असे वाक्य लाखो बीडकरांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
जगातील पहिले हे आगळे वेगळे आणि पहिलेब वृक्षसंमेलन आपल्या बीड जिल्ह्यात होत आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटायलाच हवा. या वृक्षसंमेलनाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि त्यामागचे कारण म्हणजे, या वृक्षसंमेलनाचे अध्यक्ष, ज्यावेळी या संमेलनाच्या अध्यक्षपदी चकवडाच्या झाडाची निवड करण्यात आली आहे हे ऐकले होते त्यावेळी अनेकांनी तोंडातच बोटे घातली होती. कारण आम्ही असाही अध्यक्ष असतो अथवा होवु शकतो हे कधीच पाहिले नव्हते अथवा ऐकले देखील नव्हते. परंतु सयाजी शिंदेच्या कल्पनेतुन हे सर्व साकारत आहे म्हणजे नक्कीच यात काहीतरी वेगळपण असणार हे माहित होते अगदी तसेच होत आहे. प्रामुख्याने दगडाची आसने करण्यात आलेली आहेत ही कल्पनाच भन्नाट होती व ने चित्र आज पहायला मिळत आहे ते त्याहुनही हृदय स्पशी आहे, असे संमेलन याची देही याची डोला पहायला मिळाले आहे आपल्या सर्वांचे भाग्यच माणावे लागेल.
सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि ख्यातनाम लेखक अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतुन हे समेलन भरले आहे. हे संमेलन बीड जिल्ह्यात भरवण्यामागे विविध कारणे असतील परंतु याचा सर्वात जास्त फायदा हा देखील बीड जिल्ह्यातील जनतेलाच होणार हे मात्र नकी चीड जिल्ह्याकडे आजवर कायम मागास जिल्हा म्हणुन पाहिले जात होते किंबहुना आहे. हे मागासलेपण बीडच्या नशिनी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे बीड जिल्ह्याचे वनक्षेत्र महाराष्ट्रात सर्वांत कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा महणुन बीड जिल्ह्याची ओळख आहे. कमी वनक्षेत्राचे कित्येक तोटे आम्ही मागील काही वर्षापासून सहन करत आलेलो आहोत. हवामानात होत असलेले बदल, वारंवार पडणारा दुष्काळ, कमी होत असलेले बन्यजिव हे सर्व प्रचंड वृक्षतोडीमुळेच आपल्या नशिची झाले आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही आणि हीच नस सयाजी शिंदे व अरविंद जगताप या डोळस व्यक्तींनी पकडली आणि सह्याद्री देवराई हा वृक्षप्रकल्प बीड तालुक्यातील पालवण येथे उभा राहिला. आज या ठिकाणी वृक्ष संमेलन भरते आहे, हे संमेलन महणजे आपल्या बीड वासियांसाठी पर्वणीच म्हणायला हवी कारण हे संमेलन ना भुतो ना भविष्यती असे अद्वितीयच आहे. सह्याद्री देवराई येथे वृक्षबँक निर्माण करण्यात आलेली आहे. ही बँक वृक्षांच्या ठेवीवर आक्सीजन, विविध प्रकारचे पक्षी, विविध वृक्षांची मेजवाणी भविष्यात देणार आहे. याचे संपुर्ण श्रेय सयाजी शिंदे व अरविंद जगताप तुमचे आणि केवळ तुमचेच आहे.
बीड जिल्ह्यात वृक्षांचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहचवावे यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे क्रमप्राप्त होते. हा शिवधनुष्य पेलण्याचे काम सयाजी शिंदे यांनी हाती घेतले आणि ते पुर्णत्वास देखील पेवुन जाण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या वृक्षसंमेलनाच्या माध्यमातुन जनमानसात वृक्षांप्रती जे महत्व जागृत होणार आहे, त्याचे फायदे शब्दात सांगणे देखील कठीण आहे. आव आपल्या आजुबाजुला स्वतःला वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी म्हणवुन पेणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. मात्र ज्यावेळी वृक्ष बचावासाठी एखादी चळवळ उभी करण्याची वेळ येते त्याक्षणी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नसतो. मात्र याला अपवाद म्हणावे लागतील आणि ते म्हणजे सयाजी शिंदे महानगरात राहणारा, उच्च वस्तीत अनेक दिग्गजांसोबत उठबस असलेला हा अवलिया कलाकार बीड सारख्या एका दुष्काळग्रस्त जिल्ह्याला नंदनवन बनवण्यासाठी पुढाकार घेतो हे खरोखरच कौतुकास्पदच म्हणावे लागेल, अन्यथा त्यांचा आणि आपला संबंधच काय? पण मातीशी नाळ जोडलेली काही कलावंत असतात. सयाजी शिंदे हे त्यातीलच एक सामान्य, अद्वितीय, अलौकीक व माणुसकी असलेले जनसामान्यांचे वास्तवातील नायक आहात आणि तुम्ही आमच्यासाठी हे सर्व करत आहात याचा आमहाला अभिमान आहे.
२०१५ साली मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पहायला मिळाला. या दुष्काळामुळे बीड जिल्ह्यातील शेकडो शेतक-यांना आत्महत्या करावी लागली. कारण शेतात पाणी नाही, खिशात पैसा नाही, जनावरांना खायु घालायला चारा नाही, अशा चौही बाजुने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला उरले सुरले खाजगी सावकारांनी परेशान केले. अशा एकंदर परिस्थितीत आत्महत्या करण्याशिवाय या बळीराजा समोर कोणताच पर्याय नव्हता. अशाच परिस्थितीला कंटाळुन ज्या शेकडो शेतकन्यांनी आपली जिवन यात्रा संपवली त्या परात नाम फाउंडेशनच्या माध्यमातुन एक प्रकाशाचा, आशेचा दिवा लावण्याचे काम नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोन नायकांनी केले. हे काम केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी दुष्काळाला कंटाळुन आत्महत्या केल्या आहेत प्रत्येक ठिकाणी नाना व मकरंद यांनी आपला मदतीचा हात दिला, बीड जिल्ह्यात जे काही काम नाम फॉन्डेशनच्या माध्यमातुन झाले आहे ते काम खरोखरच एखाद्या दिपस्तंभा प्रमाणे आहे. आज बीड जिल्ह्यातील कित्येक विधवा महिलांना नामच्या माध्यमातून जी संसार उपयोगी मदत झाली होती. त्यामुळे परखर्च भागण्यास मदत मिळालेली आहे. प्रथम नामच्या वतीने आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या महिलांना काही ठराविक रकम दिली गेली परंतु केवळ ही पुरेसी नाही हे लक्षात आले त्यावेळी शिलाई मशीन, एखादे छोटे यत्र यांना देण्यात आले जेणे करून या स्त्रिया स्वतःच्या पायावा उभा राहू शकतील आणि झाले देखील अगदी तसेच नामच्या या मदतीमुळे प्रत्यक्षपणे या सर्व महिलांना पाठीराखा भाऊच मिळाला आणि हे भाऊ म्हणजे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, दुष्काळी बीड जिल्ह्यासाठी फाउंडेशनच्यामाध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी जे कार्य दोन-तीन वर्षापूर्वी केले ते कार्य किती मोठे होते याचा अंदाज यंदाच्या पावसाळ्यात आला, नदी खोलीकरण, नदी | रुंदीकरण आणि लोकसहभागातून निर्माण केलेले छोटे बंधारे हे। सध्या त्या – त्या भागातील ग्रामस्थांसाठी आणि शेतकन्यांसाठी नाम जीवनदायी ठरत आहेत. ज्या कामाला शासन सरकारी तिजोरीतील लाखो रुपये पाण्यासारखे खर्च करतात तेच काम नाम फाउंडेशनने नाममात्र पैशात करून दाखवले. लोकसहभागाची ताकत काय असते हे नाना आणि मकरंद यांच्या जोडीने दाखवून दिले. या दोन खऱ्याखुऱ्या रायकामुळेच हजारो हात बीड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना लागले. या कार्याची प्यावी तितकी दखल कमीच म्हणावी लागेल, त्यामागचे कारण म्हणजे बीड जिल्ह्याला वाळवंट न होऊ देता बीड जिल्ह्यात नंदनवन फुलवण्यासाठी नाम फाउंडेशनने केलेले कार्य हे अनमोल म्हणावे लागेल.
या लेखात उद्देख केलेले चार ही व्यक्ती सिनेसृष्टीवर आपले आजही अधिराज्य गाजवत आहेत. ज्या सिने कलाकारांना एकदा पाहण्यांसाठी चाहते कित्येक तास त्यांच्या घराच्या बाहेर बसुन असतात परंतु आपले भाग्य इतके चांगले आहे की, आज हेच अभिनेते बीड जिल्ह्यात येवून जिल्ह्याच्या समस्या सोडवण्यासाठी आपले अमुल्य बोगदान देत आहेत. वास्तविक पाहता नाना पाटेकर व सयाजी शिंदे यांचा आणि बौड्या तसा फारसा काही संबंध नाही मात्र तरीही या दोघांनी मकरंद अनासपुरे आणि अरविंद जगताप यांच्या मदतीने बीडच्या प्रमुख समस्या सोडवण्याचा संकल्प जगताप यांच्या मदतीने चीडच्या प्रमख समस्या सोडवण्याचा संकल्प सोडला, केवळ सोडलाच नाही तर तो पुर्ण देखील केला. सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातुन सह्याद्री देवराई हा जो परिसर हरितमय झाला आहे त्याचे खरे महत्व आगामी काही वर्षात बीड वासियांना जानवेल, माळरानाचे नंदनवन फुलवणे कशाला म्हणतात हे सयाजीराव तुमच्यामुळेच आम्हाला पहायला मिळाले, त्यामुळेआज आम्हा लाखों बीड वासियांना अभिमानाने म्हणावे वाटते की, होय तुम्हीच आमचे खरे नायक आहात.

