सगरोळी येथे देवराई प्रकल्पा अंतर्गत संस्कृती संवर्धन मंडळ व वनपरीक्षेञ देगलुर यांच्या संयुक्त विद्यमाने आज ता. १२ जुलै रोजी आनेक मान्यवराच्या हस्ते विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून सगरोळी येथे नव्याने उदयास आलेल्या देवराई प्रकल्पा अंर्गत वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज या संकल्पनेतुन पर्यावरणाचा समतोल राखुन प्राणवायूला उजाळा देण्याच्या या संकल्पनेतुन आज ता.१२ जुलै रोजी बांबु, लिंब, शिसु, चिंच आशा विविध जातीचे जवळपास दोन हजार वृक्षाचे वृक्षारोपन करून त्यांची पूर्णतः निगा संरक्षणाची जवाबदारी हि घेण्यात आली.
या अभिनव देवराई प्रकल्पाचे वृक्षारोपण राजेश दुर्वे जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड व वनपरीक्षेञ अधिकारी, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, सरपंच प्रतिनिधी व्यंकटराव सिध्दनोड आदी प्रमुख मान्यवराच्या हस्ते सैनिकी विद्यालय तलाव लगत, अनुसयानगर तसेच सगरोळी शिंपाळा रोड लगत तलाव व वनविभागाच्या परीसरात सदर वृक्षारोपन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व गावातील प्रतिष्ठीत नागरिक व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

