तुकाई टेकडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम
३९१ शिवजयंतीनिमित्त ४०० झाडांचा वृक्षारोपण म्हणजे ४०० मशाली लागणार आहे. येथे हिरवा वणवा लागणार आहे. वसुंधरा अभियान अतिशय मोलाचे काम केले आहे. असेच अनेक ग्रुप पुढे यायला हवे, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
वसुंधरा अभियान बाणेर व सह्याद्री देवराई यांच्या माध्यमातून वृक्षदींडी आणि ४०० झाडांचे वृक्षरोपणाचा कार्यक्रम वसुंधरा अभियान मुक्त व्यासपीठ तुकाई टेकडी बाणेर येथे घेण्यात आला. हा कार्यक्रम अभिनेते, सह्याद्री देवराईच्या माध्यमातून महाराष्ट्रात हरित क्रांती पुढे नेणारे अभिनेते सयाजी शिंदे, कवी अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत झाला.
टेकडीवर नव्याने बांधलेल्या टाकी क्र.२९ उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी वसुंधरा अभियान बाणेरचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रसिद्ध कवी अरविंद जगताप म्हणाले, की वसुंधरा अभियान हेवा वाटावा असे काम करत आहे टेकड्या जिवंत करण्याचे काम कार्यकर्ते जोमाने करत आहे. ढोल ताशांच्या गजरा मध्ये वृक्षदिंडी काढली. वसुंधरा अभियानचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

