शिवजयंतीनिमित्त वृक्षारोपण म्हणजे हिव्या वणव्याची सुरुवात : सयाजी शिंदे

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त ४०० झाडांची लागवड करणे म्हणजे ४०० हिरव्या मशाली पेटविणे होय. या मशाली पेटल्या म्हणजे इथे हिरवा वणवाच लागण्यास सुरूवात होणार आहे, असे मत सह्याद्री देवराईचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
वसुंधरा अभियान, बाणेर व सह्याद्री देवराई यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त वृक्षदिंडी आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बाणेरमधील तुकाई टेकडी येथे यावेळी ४०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच टेकडीवर बांधण्यात आलेल्या ‘टाकी क्र. २९ – सावित्री’चे उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी अभिनेते शिंदे, कवी अरविंद शिंदे यांच्यासह वसुंधरा अभियानाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिनेअभिनेते शिंदे यांनी बाणेरमधील ‘वसुंधरा अभियान’कडून करण्यात येत असलेले पर्यावरणपूरक काम खूप मोलाचे आहे, अशा शब्दांत वसुंधरा अभियानाच्या कार्याचे कौतुक केले.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*