महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त सह्याद्री देवराई लातूर व लातूर वृक्ष चळवळ यांचा दुर्मीळ वृक्ष, वनस्पती संवर्धन उपक्रमाची सुरुवात सह्याद्री देवराई बोकनगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलींनी केली.
या वेळी देवराई येथे मुलींनी वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देत वृक्ष दिंडी काढली. या उन्हाळ्यात निसर्गाविषयी जनजागृती निर्माण करणारे माहिती पत्रके देऊन या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी मुलींनी आगळीवेगळी वृक्ष प्रतिज्ञा म्हटली व निसर्गाचे वृक्षांचे ऋण व्यक्त केले.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अनेक दुर्मीळ वृक्ष-वेलींची माहिती देण्यात आली. त्यात मुरमाटी बाभळ, काळा शिसम, खादीरवल्ली वेल, काबा, निर्मळी, मदन फळ, अनंतमूळ, अजाणवृक्ष, ज्योतिषमती, हळदवेल, रुद्रकोरांटी, पाच पानांचा पळस, पांढरा पळस, पांढरा शिरीष, काटेसावर, सोनसावर, पांगरा, पिंपरी असे अनेक दुर्मिळ प्रजातींचा शोध सह्याद्री देवराई लातूर तर्फे घेतला या जतन करण्यासाठी कार्य पण सुरू केले.

या उपक्रमासाठी सह्याद्री देवराई लातूरच्या आशाताई भिसे, डॉ. नीलम जाधव, राजश्री कांबळे; तसेच सह्याद्री देवराई लातूर व लातूर वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप, शिवशंकर चापुले, अमृत सोनवणे, डॉ बी आर पाटील, अॅड सुनील गायकवाड, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आदींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*