बिहार पॅटर्न एक रोजगाराची संधी

पर्यावरणाचा ढासळलेला समतोल राखण्यासाठी एक पाऊल

पर्यावरण संवर्धन, रोजगार, बिहार पॅटर्न, बांधावर व स्वमालकीच्या जागेवर वृक्षलागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासन व राज्य शासन यांची महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ६५ टक्के कामे ही कृषी आणि कृषी विषयाशी निगडित असतात. पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने व ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने बिहार पॅटर्न किंवा सार्वजनिक जागेवर वृक्ष लागवड हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे.
बिहार पॅटर्न हे वर्षाचे बाराही महिने सुरु असणारे काम असून या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकते. बिहार पॅटर्न च्या माध्यमातून ग्रामपंचायत गावठाण शासकीय जागा शाळा अंगणवाडी स्मशानभूमी रस्त्याच्या दुतर्फा व इतर सार्वजनिक जागांवर आपण वृक्ष लागवड करू शकतो बिहार पॅटर्न च्या कामाची सुरुवात साधारणपणे मे महिन्यापासून सुरुवात होते. बिहार पॅटर्नच्या कामाचा संबंधित ग्रामपंचायतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात समावेश करणे गरजेचे आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायतीने मासिक सभेचे ठरावानिशी पंचायत समितीकडे बिहार पॅटर्न अंतर्गत सार्वजनिक जागेवर कामाची मागणी करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण करण्याच्या कामाची मागणी केल्यानंतर नरेगा कक्षातील पीटीओ संबंधित कामाचे अंदाजपत्रक तयार करतात.

अंदाजपत्रक तयार केल्यानंतर पंचायत समितीचे कृषी अधिकारी संबंधित कामाला तांत्रिक मान्यता देतात. कृषी अधिकाऱ्यांनी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संबंधित कामांना प्रशासकीय मान्यता देतात. साधारणपणे २५ लाखापर्यंत प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार गटविकास अधिकारी यांना आहेत. यानंतर नरेगासोफ्ट वर संबंधित काम ऑनलाईन केले जाते नरेगा सॉफ्टवेअर संबंधित काम ऑनलाइन केल्यानंतर नरेगा कक्षात या कामाचे जिओ-टॅगिंग करतात. पीटीओ यांनी जिओ टॅगिंग केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतचे रोजगार सेवक खड्डे खोदण्याचे च्या कामाची मागणी करतात जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसन्या आठवड्यामध्ये पंचायत समितीचे नरेगा कक्षातील अधिकारी वृक्षारोपण करण्यासाठी रोपे खरेदी करण्यासाठी ऑनलाइन जनरेट करतात.
वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग या एफ टी ओ च्या क्रेडीट वर संबंधित ग्रामपंचायतीला रोपे उपलब्ध करून देतात. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. वृक्ष संगोपनाच्या संबंधित कामाचे मस्टर है एक ऑगस्ट पासून काढण्यात येणार आहे.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*