अभिनेते सयाजी शिंदे हळहळले : विकासकामासाठी ११५ झाडे तोडणार, ४३ झाडांचे स्थलांतर करणार
शाळांनी पुढाकार घ्यावा शहरातील शाळांनी पर्यावरण संवर्धनाचे गांभिर्य ओळखून विद्यार्थ्यांना या कामात सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, शाळेने विद्यार्थ्यांकडून सिडबॉल, वृक्षारोपण, देवराईबद्दल कार्य करून घ्यावे, याबाबत शाळांना जर आमच्याकडून मार्गदर्शन हवे असेल, तर त्यांनी सह्याद्री देवराईशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महापालिकेच्या सायन येथील टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसाठी इमारत बांधण्याचे काम सध्या रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या जागेत सुरू करण्यात आले आहे. मात्र येथे शेकडो जुनी झावे उभी आहेत. त्या झाडांची आता कत्तल करण्यात येत आहे. रविवारी (दि.५) रोजी सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा होत असतानाच येथील काही झाडांवर कुन्हाड मारण्यात आल्याने ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी हळहळ व्यक्त केली.
सायन रुग्णालयातील निवासीडॉक्टरांसाठी इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात अडसर ठरणारी ११५ झाडे कापली जाणार आहेत. तसेच ४३ झाडांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. रविवारी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी रुग्णालय गाठून कत्तल झालेल्या झाडांची प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक वर्षे जुनी आणि भली मोठी वाढलेली, वड, पिंपळ, आंबा, फणस, कडुनिंब आदी झाडे कापली जात असल्याने शिंदे यांनी हळहळ व्यक्त केली. शिंदे यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली असता, प्रत्यक्ष स्थितीमध्ये तफावत आढळली. त्यांनी येथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन यातील जास्तीत जास्त झाडे कतलीपासून वाचवण्याचे आवाहन केले.
शिंदे म्हणाले की, हे रुग्णालयासाठी केले जात असले, तरी झाडांची कतल झाली आहे. यातील शक्य तितक्या झाडांचे पुनर्रोपण करणे गरजेचे आहे. तसेच याबाबत कठोर कायदा होणे गरजेचे आहे. आपण आशा करू याबाबत सकारात्मक विचार होईल.

