देवराईचे वृक्षसंवर्धनाचे कार्य प्रेरणादायी

डॉ. अर्जुन गुंडे यांचे मोहाडीत प्रतिपादन

मोहाडी (ता. दिंडोरी) येथील गोपाल कृष्ण सह्याद्री देवराईचे वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी असून, देवराईमध्ये लागवड केलेल्या दुर्मिळ व देशी वाणांमुळे त्या वृक्षांचे संवर्धन होऊन नवीन पिढीला त्याचे ज्ञान व जाण होईल, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी केले.

मोहाडी येथील गोपालकृष्ण सह्याद्री देवराई येथील यावर्षीच्या वृक्ष लागवड उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सह्याद्री देवराई सदस्यांनी देवराईची सुरवातीपासूनची माहिती दिली. प्रत्येक झाडाचे गुणधर्म व महत्व जाणून घेऊन जाणीवपूर्वक देशीपूरक झाडांच्या लागवडीसंदर्भात देवराईने घेतलेल्या भुमिकेविषयी समाधान व्यक्त केले.

आजच्या निसर्गपुरक व पर्यायाने मानवास फायदेशीर झाडांची उत्कृष्ट निवड ही देवराईच्या यशाची गुरुकिल्ली आहे, अशी भावना श्री. गुंडे यांनी व्यक्त केली. देवराई सदस्य व मोहाडी ग्रामस्थांची भविष्यातील संकल्पना, उद्दिष्ट, ध्येय यासंदर्भात मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. श्री. गुंडे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. टाटा स्ट्राईव्हच्या विद्यार्थ्यांनी सह्याद्री देवराईला कुंपण म्हणून बांबूच्या वृक्षांचे वृक्षारोपण केले.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*