महिंद्र अँड महिंद्र फायनान्सतर्फे सह्याद्री देवराईत वृक्षारोपण

मोहाडी येथील सह्याद्री देवराई गोपालकृष्ण येथे महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्स सर्विस लिमिटेडतर्फे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ अधिकारी पंकज पाटील, अमृता बिर्ला, विशाल पुराणिक, उज्वल पाटील, सुनील लुल्ले, सचिन सुपारे, संदीप कोठुळे यांनी अनेक सहकाऱ्यांसह वृक्षारोपण केले.

देवराई सदस्यांनी सर्वांना देवराई व त्यातील झाडांविषयी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी देवराईच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून अशा लोकोपयोगी कार्यात महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सतर्फे देवराईस सीएसआर फंडातून वृक्ष संवर्धनासाठी अडीच लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. या निधीचे स्वरूप साधारणतः २५०० झाडांच्या जतन व संवर्धनास २.५० लाख रुपये असे असून भविष्यातही महेंद्र फायनान्स देवराई सोबत कायमच राहण्याचे आश्वासन दिले.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी सर्वांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. या निधीच्या पाठपुराव्यासाठी देवराईचे सदस्य शंकर ठाकूर यांनी मोलाचे कार्य केले. या मोहिमेमध्ये सह्याद्री देवराई महाराष्ट्र प्रमुख सचिन चंदने व योगेश पंदेरे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा देवराईतर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मोहाडी सह्याद्री देवराईचे सदस्य उपस्थित होते.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*