झाडे पृथ्वीतलावरील खरीखुरी निर्मिती

अभिनेते सयाजी शिंदे; म्हस्केवाडीत झांडाचा वाढदिवस साजरा

पारनेर, (वा.) झाडे पृथ्वीतलावरील खरीखुरी निर्मिती आहे. झाडे एकदा रूजली की शेकडो वर्षे टिकतात. नवी झाडे रूजवत राहतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी केले. तालुक्यातील म्हस्केवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या पाच वर्षांपासून अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेतून डोंगरावरील खडकाळ गायरानात देवराई रूजवण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत लागवड करण्यात आलेल्या व सुमारे साडेसहा हजार झाडांचा वाढदिवस शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. नव्याने १ हजार ७०० झाडे लावण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात अभिनेते शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी कवी भरत दौंडकर होते.

यावेळी म्हस्केवाडी येथील पर्यावरणप्रेमी पांडुरंग सोनवणे, प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, औरंगाबाद येथील देवराईचे संस्थापक पोपट रसाळ, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश औटी, संजय देशमुख, सुदाम म्हस्के, सरपंच किरण पानमंद, राजू म्हस्के, अरूण माळी आदी उपस्थित होते. वृक्षारोपनासाठी ग्रामस्थांबरोबरच म्हस्केवाडी, म्हस्केवाडी, अळकुटी येथील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सुदाम म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले तर राजू म्हस्के यांनी आभार मानले.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*