धनेश पक्षी वाचवणं म्हणजे एक जंगल निर्माण करणे- सिद्धार्थ सोनवणे
दोन महिन्यापूर्वी बीड येथे घायाळ अवस्थेत मातृत्व दुरावलेले एक धणेश पक्षाचे पिल्लू निसर्ग मित्र सोनू पवार व डॉ. शशीकुमार सवाई यांना आढळून आले होते. या पक्ष्यास त्यांनी उपचारासाठी सर्पराज्ञीत दाखल केले होते. सर्पराज्ञीतील उपचार व सेवा शुश्रूषेनंतर दोन महिन्यानंतर पूर्णपणे बरे झालेल्या या धनेश पक्षास दि.२९ रोजी सकाळी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आघाव यांच्या हस्ते निसर्गात मुक्त करण्यात आले. यावेळी सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे उपस्थित होत्या. छत्र छाया पासून दूर झालेले धणेश पक्षाचे पिल्लू बीड येथील निसर्ग मित्र सोनू पवार व डॉ. शशिकुमार सवाई यांना दि.२५ जुलै रोजी घायाळ अवस्थेत आढळून आले होते. या घायाळ धनेश पक्षाच्या पिल्लास त्यांनी ताबडतोब उपचारासाठी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव येथे दाखल केले होते.
दोन महिने या पक्षाची सर्पराज्ञीत सेवा सुश्रुषा करण्यात आली. तब्बल दोन महिन्यानंतर पूर्णपणे बरा झालेल्या धनेश पक्षास आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी आई पित्याच्या शिरूर कासार येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आघाव सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांच्या उपस्थितीत निसर्गात मुक्त करण्यात आले. धनेश पक्षाविषयी माहिती देताना सर्पराज्ञीचे संचालक वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे म्हणाले की, धनेश पक्षी हा दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला असून त्याला वाचवणे हे गरजेचे आहे.
धनेश पक्षाला वाचवनं, म्हणजे जंगल वाचवणे होय, अन जंगल वाचवणं म्हणजे धनेश पक्षी वाचवनं होय. धनेशला वाचविण्यासाठी मोठमोठ्या झाडांना वाचवणे गरजेचे आहे. कारण धनेश पक्षांना प्रज्योत्पादनासाठी मोठमोठे झाडांच्या ढोलीची आवश्यकता असते. हा पक्षी मोठं मोठ्या झाडांच्या ढोलीत आपले घरटे बनवून अंडे देत असतात. त्यासाठी मोठ मोठाले झाडांचे संरक्षण संवर्धन आणि जतन करणे गरजेचे आहे. शेतीसाठी उपद्रवी असणारे उंदीर, कीटक यांनाही वेळप्रसंगी हे पक्षी खातात. धणेश पक्ष्यास राखी धनेश, धनचिडी, सिंगोरा, सिंगचोचा, धनेरा या नावानेही ओळखले जाते.

